दिवाळी, जी दीपावली म्हणूनही ओळखली जाते, भारतीय उपखंडामध्ये साजरा करण्यात येणारा सर्वात मोठा सण आहे. हा उत्सव प्रकाश, आशा आणि नवीन सुरुवात यांच्याशी जोडलेला आहे. तसेच हा उत्सव प्रामुख्याने दिवाळीची सजावट आणि दिवाळीचे रुचकर मिष्टान्न यांच्याशीही संबंधित आहे. या पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला सांगू की यावर्षी दिवाळी 2020 कधी आहे आणि ती तुम्ही अत्यंत उत्साहाने कशी साजरी करू शकाल.

भाग 1. या वर्षी दिवाळी कधी असेल

सर्वसाधारणपणे, हिंदूच्या चंद्र कालगणनेनुसार सर्वात जास्ती अंधारमय अशा रात्री दिवाळी सण साजरा केला जातो. म्हणजेच,कार्तिक महिन्यातील अमावस्या या दिवशी (ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीस). यावर्षी, दिवाळीचा हा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन ७ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. तथापि दिवाळीचा उत्सव हा एकूण ५ दिवसांचा आहे. ५ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवसापासून हा सण सुरू होईल. ६ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळी साजरी केली जाईल. लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या मुख्य दिवसानंतरचा ८ नोव्हेंबर हा दिवस बलिप्रतिपदा अर्थात गोवर्धन पूजा म्हणून साजरा केला जाईल तर ९ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी होईल. या वर्षी दक्षिण भारत आणि काही इतर प्रांतात सुद्धा दिवाळी ६ नोव्हेंबर ला साजरी होणार आहे.
दिवाळी शुभेच्छा

भाग 2. दिवाळी बद्दल: आम्ही दिवाळी का साजरा करतो

जरी वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमीची लोक दिवाळी त्यांच्या स्वत:च्या पद्धतीने साजरी करत असली, तरी दिवाळीचे एक सर्वमान्य महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे वाइटावर चांगलेपणाचा विजय साजरा करणे. हा सण प्रतिक आहे की वर्षातील सगळ्यात अंधाऱ्या रात्रीलाही सभोवतालचा प्रकाश उजळून टाकू शकतो. हिंदू पुराणांनुसार, दिवाळीच्या संध्याकाळी रावणाला पराभूत करून भगवान श्रीराम (सीता आणि लक्ष्मण यांच्यासमवेत) घरी परतले. त्यांच्या गावातील लोकांनी (अयोध्या) त्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शहर उजळवून टाकले. तेंव्हा पासून भाविक देखील याच पद्धतीचे अनुसरण करतात आणि देवी-देवतांचे आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या घरी त्यांचे स्वागत करतात.
दिवाळी

भाग 3. दिवाळी कशी साजरी करायची

भारत ही विविध जातीधर्म आणि वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा असलेली भूमी आहे त्यामुळे लोक दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी करतात. दिवाळीचा इतिहास थेट रामायणा इतका जुना आहे, रामायण जो हिंदूंचा सर्वात महत्वाचा धर्म ग्रंथ आहे (भगवान राम आणि त्याचे वंशज). लोक दिवसाची सुरुवात रामाच्या मंदिरात दर्शनास जाऊन काही धार्मिक विधी करून करतात. त्यानंतर दिवाळी सजावट सुरु होते. दिवाळीच्या परंपरेचा रांगोळी हा महत्त्वाचा घटक आहे, कारण लोक त्यांच्या अतिथींचे स्वागत करण्यासाठी जमिनीवर रंगीबेरंगी,नक्षीदार रांगोळ्या काढतात.
दिपावली
दिवाळीच्या संध्याकाळी ‘दीप पूजन’ करून लक्ष्मीपूजन करतात. लोक भक्तिभावाने घरात पणत्या, दिवे, आकाश कंदील, दिव्यांच्या माळा लावून देवी लक्ष्मीचे श्रद्धापूर्वक स्वागत व पूजन करतात. यानंतर दिवाळीचा उत्सव साजरा करायला सुरुवात होते. लोक आपल्या इष्ट मित्रांना भेटी देत एकत्र येत,हास्यविनोद करत, दिवाळीच्या मिठाईची देवाणघेवाण करतात. बाकीची संध्याकाळ मग संगीत, नृत्य, आतषबाजी आणि कुटुंबीय व सगेसोयरे यांच्यासोबत मौजमजा करण्यात घालविली जाते.

भाग ४. स्नॅपट्युबवर दिवाळी संबधी अधिक माहिती शोधा

जर आपण दिवाळीसंबंधी गाणी, आरत्या,पाककृती, सजावट कल्पना इत्यादी विषयी अजून माहिती मिळवू इच्छित असाल तर आपल्या Android डिव्हाइसवर स्नॅपट्युब स्थापित करा. हे एक विनामूल्य उपलब्ध अॅप आहे ज्यामध्ये व्हिडिओ सामायिकरण प्लॅटफॉर्मची विस्तृत श्रेणी आधीपासूनच उपलब्ध केली आहे. वापरकर्ते या अॅपचा वापर करून दिवाळीशी निगडीत अनेक व्हिडिओ जसे की रांगोळीचे प्रकार, सजावट, पाककृती, आरती, भक्ती संगीत आणि इतर अनेक गोष्टींचा शोध घेऊ शकतात. आपल्या इच्छेनुसार आपण आपल्या डिव्हाइसवर कोणताही व्हिडिओ,ऑफलाइन पाहण्यासाठी जतन देखील करू शकता. इतक्या विविध गोष्टी आपल्याला देऊ करत असल्यामुळे निश्चितच कोणत्याही android वापरकर्त्यांकडे हे अॅप असणे आवश्यकच आहे. मग त्वरा करा, हे अॅप डाउनलोड करा आणि आपल्या प्रियजनांसह आनंदात वेळ घालवा.
snap tube for android
डाउनलोड

भाग ५. दिवाळी गाणी आणि व्हिडिओ

कोणताही भारतीय सण सुयोग्य संगीताशिवाय अपूर्ण आहे. दिवाळी हा तर मोठा उत्सव असल्यामुळे, त्या संबंधित सर्व प्रकारचे दिवाळी व्हिडिओ आणि गाणी आपण सहजपणे ऑनलाइन शोधू शकतात. या सणाच्या निमित्ताने आपण आनंद घेऊ शकाल अशी काही आपल्या आवडीची गाणी आम्ही आपल्यासाठी इथे घेऊन आलो आहोत.

१) दिवाळीसाठी माता लक्ष्मीची आरती

२) दिवाळीचे आनंदी गाणे

३) दिवाळीसाठी महा लक्ष्मी मंत्र आणि गणेश आरती

४) मुलांसाठी शुभ दीपावली गीते

५) दीपावली मनाइ सुहानी आणि इतर धार्मिक गाणी

भाग ६. दिवाळी सजावटीसाठी कल्पना आणि पाककृती

भारतातील जवळजवळ प्रत्येकजण दिवाळीच्या वेळी आपले घर वेगवेगळ्या पद्धतीने सजवतो
आणि आपल्या अतिथींच्या स्वागतासाठी दिवाळीचे रुचकर पदार्थ बनवतो. दिवाळीचे काही पदार्थ हे देवतांना अर्पण करण्यासाठी नेवैद्य-प्रसाद म्हणूनही वापरले जातात.
येथे काही पाककृती आणि दिवाळीच्या सजावटीसाठी कल्पना आहेत ज्या आपण करून पाहू शकता.

1. दिवाळी DIY मोमबत्ती स्टँड

2. दिवाळी DIY होम डेकोर कल्पना

3. दिवाळीसाठी DIY लोंबती तोरणे

4. गव्हाच्या पिठाची चकली रेसिपी

5. नारळ लाडू रेसिपी

6. स्वादिष्ट बालुशाही रेसिपी

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

updated by Chief Editor on Mar 10, 2020

Categories